गडचिरोली : रानटी हत्तीच्या कळपात सापडून इसमाचा मृत्यू

0
451

– परिसरात भीतीचे वातावरण

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, १७ ऑक्टोबर : जिल्हा मुख्यालयानजीक असलेल्या दिभना परिसरात रानटी हत्तीच्या कळपाने तळ ठोकलेला आहे. अशातच आज मंगळावर १७ ऑक्टोबर रोजी रात्रोच्या सुमारास हत्तीच्या कळपाच्या तावडीत सापडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. ढेकलू बबन गुरनुले असे मृतकाचे नाव आहे.
मागील काही दिवसांपापूर्वी पोर्ला वनपरिक्षेत्रात हत्तीच्या कळपाने प्रवेश केला होता. दरम्यान हा कळप पोर्ला, चुरचुरा, गोगाव होत दिभना, जेप्रा परिसरात तळ ठोकून आहे. यादरम्यान या कळपाने धान शेतीचे अतोनात नुकसान केला आहे. आज १७ ऑक्टोबर रोजी रात्रोच्या सुमारास हत्तीचा कळप दिभना परिसरात धान पिकांची नुकसान करत असतांना ढेकलु बबन गुरनुले व आणखी एकजण शेतशिवारत गेले असता कळपातील एका हत्तीने त्यांच्या दिशेने हल्ला केला. या तावडीत गुरुनुले हे सापडल्याने हत्तीने त्यांना तुडवत ठार केल्याची माहिती आहे. सदर घटनेने मात्र परिसरातील नागरिक भयभीत झाले असून रानटी हत्तीची दहशत पसरली आहे.
रानटी हत्तीच्या आगमनाने हत्तीच्या कळपाजवळ नागरिकांनी जाऊ नये याबाबत वनविभाग वारंवार सूचना देत आहेत. हत्तीच्या कळपावर वनविभागाचे कर्मचारी पाळत ठेवत आहे मात्र असे असतानाही काही नागरिक सूचनेला न जुमानत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here