गडचिरोली शहरातील अतिक्रमणाने रस्ते झाले अरुंद, अपघातात वाढ

0
396

– वाहतूकीवर नियंत्रण,अतिक्रमित फुटपाथ विक्रेते व दुकानदार, बेजबाबदार वाहनधारक यांच्यावर कारवाई करण्याची विश्व हिंदू परिषद बजरंगदल गडचिरोलीची मुख्य कार्यकारी अधिकारी न.प यांना निवेदनातून मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ३ मे :- शहरात अपघाताचे प्रमाण वाढले असून अपघाताची मालिका सुरूच आहे. शहरात दिवसेंदिवस होत असलेल्या अतिक्रमनाने रस्ते अरुंद होत आहेत त्यामुळे अतिक्रमित फुटपाथ विक्रेते व दुकानदार, तसेच अवजड वाहनाची वाहतूक होत असल्याने बेजबाबदार वाहनधारकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंगदल गडचिरोलीच्या वतीने निवेदनातून मुख्य कार्यकारी अधिकारी न.प यांना केली आहे.
शहरात दिवसेंदिवस अतिक्रमणाचा वाढ होत आहे, मुख्य मार्गावरच अतिक्रमण होत असून दुकाने, स्टॉल, वाहन इत्यादीमुळे मुख्य रस्ता अरुंद झालेला आहे मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. १ मे रोजी कारगिल चौकात भीषण अपघात झाला यात युवकाला प्राण गमवावे लागले. तसेच त्यापूर्वीही पोलीस ठाण्यासमोर भीषण अपघात इसमाचा जीव गेला. रस्त्यावर होत असलेले अतिक्रमण तसेच अवैध वाहतूक पार्किंगमुळे रस्ता अरुंद होत चाललेला आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत असून अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे सदर गंभीर बाबीचा प्रकाश टाकून अतिक्रमित फुटपाथ विक्रेते तसेच बेजबाबदार वाहन धारकावर योग्य कार्यवाही करून व्यवस्थापन करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद बजरंगदल गडचिरोली यांनी नगर परिषदेचे मुख्यधिकारी, तसेच पोलीस ठाणे गडचिरोली येथे निवेदनातून केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here