कोरची पंचायत समितीतर्फे सहायक प्रशासन अधिकार्‍यांना निरोप

225

लोकवृत्त न्यूज 
कोरची २९ जून : येथील पंचायत समितीच्‍या वतीने पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी सुचिता आसकर यांना बुधवार (ता. २८) शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला.
कोरची येथील सहायक प्रशासन अधिकारी सुचिता आसकर यांचा २०२३ या वर्षातील नियमित बदल्यांमध्ये जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात बदली झाल्याने त्यांना पंचायत समितीमधून भारमुक्त करण्यात आले. त्यांना पंचायत समितीमधील सर्व कर्मचार्‍यांच्या वतीने शाल, श्रीफळ व महिला कर्मचार्‍याच्या वतीने भेटवस्तू देऊन निरोप देण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी कृषी अधिकारी रेणू दुधे होत्‍या. संचालन नितीन नैताम, प्रास्ताविक कृषी विस्तार अधिकारी देवानंद फुलझेले, मार्गदर्शन कुमारसाय सिंद्राम यांनी केले. कार्यक्रमासाठी दिगंबर पेंटेवाड, विस्तार अधिकारी राहुल कोपुलवार, शीतल साळवे, कल्याणी दिघोरे, छत्रपाल अंबादे, प्रभाकर बावनकर, चरित्र उईके, विनोद चौरे, धिरज ढवळे व कर्मचारी उपस्थित होते.