सुरजागड लोहखदान मध्ये भीषण अपघात

879

– तिघेजण ठार झाल्याची माहिती
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ७ ऑगस्ट : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात सुरू असलेला सुरजागड लोहखदानमध्ये भीषण अपघात होऊन तिघेजण ठार झाल्याची घटना रविवार ६ ऑगस्ट रोजी घडली. या अपघातात अभियंतासह दोन मजूर ठार झाले आहे. त्यामुळे आता पुन्हा सुरजगडच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सुरजागड पहाडीवर लॉयड मेटल्स कंपनीकडू लोहखनिज उत्खनन सुरू आहे. दरम्यान या पहाडीवरून उत्खनन करणारे वाहन खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर कोसळले. तेथे उभे असलेले अभियंता सोनल रामगीरवार व हरयाणातील दोन मजूर ठार झाले. या घटनेनंतर तिघांनाही तातडीने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून मृत घोषित केले. या घटनेने एटापल्ली, आलापल्ली, अहेरीत तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहिती आहे. मृतक अभियंता सोनल रामगीरवार यांचा वर्षभरापूर्वीच विवाह झाला होता. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.