भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप मध्ये निवड झालेल्या खेळाडूंचा सत्कार

0
264

गडचिरोली जिल्ह्यामधून झाली चार खेळाडूंची निवड

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली १ ऑगस्ट :- आगामी सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) मध्ये होणाऱ्या ऑल इंडिया टेनिस बॉल क्रिकेट चॅम्पियनशिप साठी विदर्भ टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन नागपूर कडून महिला व पुरुष टीम घोषित करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यामधील नेहाल उपाध्ये ,आकाश भोयर,विपीन गणवीर व आनिकेत चलाख या चार खेळाडूंची निवड करण्यात आली. याची माहिती मिळताच भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी त्यांची भेट घेतली व त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केले.व त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
त्याप्रसंगी अनिलजी पोहनकर, भायुमो चे जिल्हा महामंत्री अनिल जी तिडके, भास्कर बुरे सरपंच मुरखळा, शेषराव कोहळे उपसरपंच सोनापूर, दीपक सातपुते भयुमो जिल्हा उपाध्यक्ष व खेळाडू उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here