लोनबले पोलिस विरता पदकाने सन्मानित

0
113

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर ३० जुलै : केंद्रीय सशस्त्र बल सी आर पी एफ च्या 85 व्या स्थापना दिनाचे आयोजनाप्रसंगी सी आर पी एफ संस्थेच्या वतीने खुशाबराव उपासराव लोनबले यांना आय बी चे डायरेक्टर श्री तपन कुमार डेका यांच्या हस्ते पुलिस विरता पदक देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक 27 जुलै 2023 रोजी सी आर पी एफ शौर्या संस्था, दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता.
दिनांक 29 ऑगस्ट 2020 रोजी च्या रात्री जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील जडूरा या गावातील परिसरात एका संयुक्त अभियाना दरम्यान एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी कर्तव्यावर असलेल्या एस आर पी एफ सुरक्षा कार्मिकांवर अंदाधुंद फायर केला, प्रतिउत्तरात आपल्या प्राणांची चिंता न करता सिपाही खुशाबराव उपासराव लोनबले आणि त्यांचे दोन सहकारी हवलदार लोगनाथन व सिपाही नजर अहमद अंटू यांनी उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि कुशल रणनीतीने जैश-ए-मोहम्मदच्या 1 आणि हिज्बुल्लाह मुजाहिदीनच्या 2 कुख्यात आणि खुंखार आतंकवादींना ठार केले होते. या उत्कृष्ट युद्ध कौशल्य आणि विरतापूर्ण कार्यासाठी त्यांना राष्ट्रपतीद्वारा दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी विरता पोलीस पदक जाहीर करण्यात आले होते. आणि तो या सी आर पी एफ स्थापना दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाप्रसंगी देण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी केंद्रीय रिजर्व पुलीस बलाचे महानिदेशक डॉ. सुजोय लाल थॉसेन यांच्या सह इतर वरिष्ठ अधिकारी, सी आर पी एफ चे जवान आणि वीर परिवार उपस्थित होते.
सिपाही खुशाबराव उपासराव लोनबले हे चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पवनपार या छोट्याशा खेड्यातून 2017 मध्ये सी आर पी एफ या केंद्रीय सशस्त्र बलमध्ये भरती होऊन प्रशिक्षणानंतर अत्यंत संवेदनशील आणि आतांकवाद्यांचे माहेरघर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुलवामा (जम्मू आणि काश्मीर) या ठिकाणी 183 बटालियन मध्ये तैनात झाले आहेत. देश सेवेसोबतच त्यांना साहित्य क्षेत्रात विशेष रुची असून त्यांच्या कविता लेख अनेक वर्तमान पत्रातून प्रकाशित झाल्या आहेत.
त्यांना पोलिस वीरता पदक मिळाल्याबद्दल आणि पुढील देश सेवेसाठी मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here