गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

0
96

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली २७ जून : स्थानिक गोंडवाना सैनिकी विद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संजीव गोसावी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पर्यवेक्षक अजय वानखेडे, ज्येष्ठ शिक्षक देवेंद्र म्हशाखेत्री उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष तथा पाहुण्यांच्‍या हस्ते राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज हे खरे लोकशाहीवादी आणि समाजसुधारक मानले जात होते. शाहू महाराज हे एक सक्षम राज्यकर्ते होते. त्यांच्या राजवटीत शाहू महाराजांनी अनेक पुरोगामी धोरणे यशस्वीपणे राबवली. १८९४ मधील त्यांच्या राज्याभिषेकापासून ते १९२२ मध्ये त्यांच्या निधनापर्यंत त्यांनी राज्यातील मागास जातींतील लोकांसाठी काम केले. जात-पंथाची पर्वा न करता सर्वांना प्राथमिक शिक्षण देणे हे त्यांचे सर्वांत महत्त्वाचे प्राधान्य होते. शाहू महाराज हे दीन दलितांचे कैवारी होते. गरजूंना मदत करणारे होते, असे मत प्राचार्य संजीव गोसावी यांनी व्यक्त केले. संचालन गजानन अनमुलवार यांनी केले, तर आभार योगेश आसमवार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here