गडचिरोली पोलीस नक्षल चकमक: १ नक्षलवादी ठार

0
730

एक नक्षलवादी ठार तर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात यंश 

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 30 नेसप्टेंबर:- गडचिरोली जिल्ह्यांतील  उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पाश्र्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे 30 ते 40 नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक 28/09/2022 रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजा कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-60) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक 28/09/2022 रोजीचे सायं. 7:00 ते 8:00 वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. सदर नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळावर 01 नक्षल मृतदेह मिळुन आले. तसेच मृतदेहासोबत 8 एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-60 कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here