ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

388

गडचिरोली : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. शिवनाथ कुंभारे यांचे दुःखद निधन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि. २८ एप्रिल :- झाडीपट्टी प्रदेशातील ज्येष्ठ समाजसेवक तथा अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे माजी जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथजी कुंभारे यांचे आज (२८) सकाळी ११ वाजता गडचिरोली येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते.
त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता कठाणी नदी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. अनंता कुंभारे, तीन मुली, नातवंडे व मोठा परिवार आहे.
डॉ. कुंभारे यांनी सुमारे ५० वर्षे दुर्गम व आदिवासी भागात वैद्यकीय सेवा व समाजकार्य केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले.
त्यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.