गडचिरोली पोलीस अधिकारी व अंमलदार मा. राष्ट्रपती “पोलीस शौर्य पदक जाहीर

0
958
एक अंमलदार यांना “गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक” जाहीर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 25 जानेवारी:- देशभरामध्ये पोलीस दलात किंवा इतर सशस्त्र दलात उत्कृष्ट व शौर्यपुर्ण कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रजासत्ताक दिनानिमीत्त शासनाकडून सन्मानित केले जाते. यावर्षी सुद्धा आज दिनांक 25 जानेवारी 2024 रोजी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंधेला गडचिरोली पोलीस दलातील 18 पोलीस अधिकारी व अंमलदारांना मा. महामहीम राष्ट्रपती यांचे “पोलीस शौर्य पदक” व 01 “गुणवत्तापुर्ण सेवासाठी पदक” जाहीर झाले आहे. संपूर्ण देशभरात एकुण 275 पोलीस शौर्य पदक व 753 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असून, त्यापैकी गडचिरोली पोलीस दलास 18 पोलीस शौर्य पदक व 01 गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहेत. ही निश्चितच गडचिरोली पोलीस दलासाठी अभिमानास्पद कामगिरी आहे. तसेच सन 2023 या वर्षामध्ये 62 पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक प्राप्त झाले होते. सन 2024 मध्ये एकुण 19 पोलीस अधिकारी/अंमलदार यांना मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे.
पोलीस शौर्य पदक प्राप्त अधिकारी व अंमलदार,
1)सोमय विनायक मुंढे, भा.पो.से. पोलीस अधीक्षक लातुर,
2)संकेत सतीश गोसावी उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग करवीर जि. कोल्हापुर,
3) पोहवा/3078 मोहन लच्छु उसेंडी,
4) पोहवा/873 देवेंद्र पुरोषत्तम आत्राम
(2ND BAR to PMG,)),
5) पोहवा/2734 जीवन बुधाजी नरोटे,
6) पोहवा/2612 माधव कोरके मडावी,
7) पोहवा/2474 संजय वत्ते वाचामी
(1ST BAR to PMG,)
8) पोहवा/3029 मुंशी मासा मडावी
9) पोहवा/3047 गुरुदेव महारुराम धुर्वे,
10) पोनाअं/3729 कमलेश निखेल नैताम,
11) पोनाअं/3743 शंकर पोचम बाचलवार,
12) पोनाअं/3026 विनोद मोतीराम मडावी,
13) पोनाअं/4136 दुर्गेश देविदास मेश्राम,
14) पोअं/3718 विजय बाबुराव वडेट्टीवार,
15) पोअं/5488 कैलाश श्रवण गेडाम,
16) पोअं/4497 हिराजी पिताबंर नेवारे,
17) पोअं/5697 ज्योतीराम बापु वेलादी,
18) पोअं/1156 सुरज देवीदास चुधरी
यांना पदक मिळाले असुन

01) सहा.फौ/3248 देवाजी कोट्टु कोवासे यांना गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले आहे.

वरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेल्या उल्लेखनिय व वैशिष्टयपुर्ण कामगिरीची दखल घेऊन मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य व गुणवत्तापुर्ण सेवेसाठी पदक जाहीर झाले असुन, त्याबद्दल मा. प्रभारी पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी (प्राणहिता)एम. रमेश सा. या सर्वांनी त्यांचे कौतुक केले आहे व त्यांच्या पुढील सेवेकरीता शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here