टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये धावले गडचिरोलीचे युवक

0
226

गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उडान अंतर्गत मिळाली युवकांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली २१ जानेवारी :- गडचिरोली जिल्हा माओवाददृष्ट्या अतिसंवेदनशिल जिल्हा असून येथील दुर्गम अतिदुर्गम भागात राहणाऱ्या युवकांना विविध खेळांमध्ये प्रोत्साहन देण्याकरीता व त्यांच्या क्रिडागुणांना याच मिळण्याकरीता अनेक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये कबड्डी, व्हॉलीबॉल व मॅरेथॉन यासारखे अनेक उपक्रम राबविले जातात. याचाच एक भाग म्हणून गडचिरोली पोलीस दल मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करीत असते. या मॅरेथॉन स्पर्धेच्या माध्यमातून युवक व युवतींनी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव उंचविता यावे या उद्देशाने, गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या प्रोजेक्ट उड़ान अंतर्गत मा. पोलीस अधीक्षक गडचिरोली नीलोत्पल सा. यांच्या संकल्पनेतून व मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता सा. यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील २५ युचक-युचती व पोलीस अधिकारी/अंमलदार यांनी आज दिनांक २१/०१/२०२४ रोजी मुंबई येथे होत असलेल्या टाटा मेरेथॉनमध्ये ४२ कि.मी (फुल मॅरेथॉन) व २१ कि.मी. (हाफ मॅरेथॉन) करीता सहभाग नोंदविला,

मुंचई येथे दरवर्षी टाटा मॅराथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असते. या मॅराथॉन स्पर्धेमध्ये राज्यातीलच नव्हे तर परदेशातील खेळाडू सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभागी होत असतात. सदर मॅराथॉन स्पर्धेकरीता गडचिरोली जिल्ह्यातील अतीदुर्गम भागातील युवकांना संधी देण्यासाठी ६१ पोस्टे/उपपोस्टे/पोमकें मधील युवकांची निवड चाचणी घेण्यात आली. त्यानंतर २५ युवक-युवतींची निवड करुन गडचिरोली पोलीस दलातर्फे मॅरेथॉनसाठी लागणारे सर्व साहीत्य वाटप करुन राष्ट्रीय स्तरावरील तज्ञ प्रशिक्षकांकडून योग्य सरावाचे नियोजन करून दोन महिण्याचे निवासी प्रशिक्षण पोलीस मुख्यालय येथे देण्यात आले. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना त्यांची शारीरिक क्षमता वाढविण्याकरीता कसून सराव घेण्यात आला. यामध्ये २१ किमी, २५ किमी, ३५ किमी व ४२ किमी, धाचणे, स्टेन्थनिंग एक्सरसाईज, एचीसी एक्सरसाईज, हिल एक्सरसाईज इ. शारीरिक कवायतींचा समावेश होता. या प्रशिक्षणादरम्यान युवक-युवतींना वेळोवेळी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. य मा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिता सा. यांचे मार्गदर्शन लाभले.

सदर टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धेमध्ये ४२ किमी. गटात गडचिरोलीचे पोनि. कुंदन गावडे, परिपोउपनि, धनराज कोळी, परिपोउपनि, शामरंग गयळी, परिपोउपनि, मयुर पवळ, जय नलेश्वर नंदनवार, टिकू चंद्रभान चलाख, रोहन संजय भूरसे, अमोल रविंद्र पोरटे, सुमीत दिगांबर चौधरी, सागर नानाजी दुर्गे, विशाल सत्यवान रामटेके, तुषाल शंकर गायतुरे, संपतराय लच्चा ईष्टाम, यश राजु भांडेकर, दिनेश व्यंकटी मडापी, अमीत विश्वनाथ कावडे, योगश जंतुराम चनाप, सुरज लुल्ला तिम्मा, अभिषेक सुरेश कुमरे, पियुष सोनुले, सौरभ कन्नाके तसेच प्रकाश रमेश मिरी (४२ किमीमध्ये २ तास, ५४ मी.), सुरज साईनाथ बोटरे (४२ किमीमध्ये २ तास, ५४ मी.) आणि २१ किमी. या गटात नापोअं/५७९० शांताराम सपकाळ व प्रियंका लालसु ओकसा (२१ किमीमध्ये १ तास, ३७ मी.) यांनी सहभाग नोंदविला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here