माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी अमृत महोत्सव ठरला ऐतिहासिक

199

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ४ फेब्रुवारी :- गव्हर्नमेंट हायस्कूल गडचिरोली ला ७५ वर्ष पूर्ण झाल्याने ६५ वर्षापासून दुरावलेले मित्र मैत्रीण ना या अविस्मरणीय आनंदाचा पारावर राहिला नाही. अनेकांच्या डोळ्यात ते शालेय जीवन आयुष्यात परत जगता आले.
येथील जिल्हा परिषद (मा. शा.) हायस्कुल तथा कनिष्ठ महाविद्यालय, गडचिरोली येथे माजी विद्यार्थी- विद्यार्थीनी यांनी आयोजित केलेल्या या अमृत महोत्सव कार्यक्रमात १९५१ पासूनचे विद्यार्थी विद्यार्थीनी हजारावर उपस्थित होते.१९५९ पासून या शाळेत सेवा दिलेले शिक्षक व कर्मचारी हे उपस्थित होते.
सकाळी विदयार्थी यांची गडचिरोली तुन प्रभात फेरी काढण्यात आली. या प्रभात फेरी मध्ये शेकडो विद्यार्थी हे शालेय गणवेश मध्ये उपस्थित हिते. प्रभात फेरी वर अनेकांनी ठीक ठिकाणी पुषवृष्टी करून स्वागत करण्यात आले. देश विदेशातून आलेल्या माजी विद्यार्थी विदयार्थीनी यांचे कार्यक्रम स्थळी भव्य पुष्प वटी ने स्वागत करण्यात आले.स्वागत करण्यात आले.
राष्ट्रगीताने कार्यक्रमची सुरुवात झाली. यावेळी अमृत महोत्सव चे अध्यक्षस्थानी गोवर्धन सर हे उपस्थित होते. मंचावर श्याम रणदिवे, अशोक देशपांडे, जनार्धन आखाडे, मंगटे,बावणे, मडावी आदी उपस्थित होते.कार्यक्रम चे प्रास्ताविक उदय धकाते यांनी केले.
यावेळी १९५१ च्या. प्रथम मेरिट आलेल्या कु. सुहास बोरावार, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शालिनीताई कुमरे, कोरेट्टी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच जेष्ठ विद्यार्थी यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी विद्यार्थी निवृत्त न्यायाधीश चंदा सारडा, लक्ष्मीकांत पतरंगे,प्रकाश पाटील मारकवार, डॉ. प्रमोद मुनघाटे,डॉ.अशोक टिकले, उल्हास नरड यांनी शालेय जीवनातील आठवणीं जगावल्या.
हजारो विद्यार्थी यांना उपस्थित शिक्षकांनी मार्गदर्शन पर बहुमूल्य संबोधन केले. यावेळी गीत गायनाचा कार्यक्रम, परिचय, गुरु जणांचे आशीर्वाद कार्यक्रम घेण्यात आले. संध्याकाळी साडे सहाला कार्यक्रम वांडव मातरम च्या गायनाने सांगता करण्यात आली.
कार्यक्रम चे संचालन प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, अपर्णा रोटकर, सुनील पेंदोरकर, प्रकाश पंधरे तर आभार प्रदर्शन सतीश पवार यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी विद्यार्थी निमेश पटेल,राजेश निखारे, लता धात्रक, पुष्पलता कुमरे, सुरेखा न्यालेवार, विद्या हजारे,, निलेश दंडवते समीर कडीवाल, अजय तुम्मवार,आदींनी श्रम केले.

या अमृत महोत्सव कार्यक्रम माजी शाळानायक उदय धकाते यांनी आयोजित करून देश- विदेशात असलेल्या माजी विद्यार्थी-विद्यार्थिनीं यांना एकत्र आणून भव्य दिव्य कार्यक्रमात मित्र मैत्रिणीचा ६०-६५ वर्षानंतर शाळेत भेट घडवून अविस्मरणीय दिवस ठरला.