अव्वल कारकुन लाच घेतांना एसीबीच्या जाळ्यात

0
152

कुरखेडा उपविभागीय अधिकारी कार्यालयातील प्रकार 

– पंधरा हजरांच्या लाचेची केली मागणी

लोकवृत्त न्यूज 
गडचिरोली, ६ फेब्रुवारी : तक्रारदारास आदिवास ते आदिवासी ला जमीन विकी करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुरखेडा येथील अव्वल कारकून नागसेन प्रेमदास वैद्य ( वय ४६) (वर्ग-३) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १३ हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले. सदर कारवाईने विभागात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तकारदारास आदिवास ते आदिवासी ला जमीन विकी करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन कुरखेडा उपविभागीय कार्यलयातील अव्वल कारकून नागसेन प्रेमदास वैद्य यांनी तक्रादारस १५ हजार रुपयांच्या लाच रक्कमेची मागणी केली. तक्रारदार यांना आरोपीस लाच रक्कम देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली येथील अधिकाऱ्यांना भेटुन तकार नोंदविली. पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे, ला.प्र.वि. गडचिरोली यांचे पर्यवेक्षणात पो.नि. श्रीधर भोसले यांनी तक्रारदाराने दिलेल्या तकारीची अत्यंत गोपनीयरित्या शहानिशा करून सापळा कारवाईचे आयोजन केले असता, त्यामध्ये पडताळणी दरम्यान तकारदार यांस आदिवास ते आदिवासी ला जमीन विक्री करण्याचे परवानगीचे आदेश तयार करून दिल्याचा मोबदला म्हणुन अव्वल कारकून नागसेन वैद्य यांनी १५ हजार रुपये लाच रक्कमेची मागणी केली व तडजोडीअंती १३ हजार रुपये स्विकारतांना उपविभागीय अधिकारी कार्यालय कुरखेडा येथील स्वतःचे कक्षात स्वीकारतांना रंगेहाथ मिळून आल्याने त्यांचेविरूध्द पोस्टे, कुरखेडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी श्री नागसेन वैद्य यांचे वडसा येथील निवासस्थानाची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयातील चमुकडून झडती घेण्यात आली.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक राहुल माकणीकर, लाप्रवी, नागपूर, सचिन कदम अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपूर, संजय पुरंदरे अपर पोलीस अधिक्षक, ला.प्र.वि. नागपुर यांचे मार्गदर्शनात व पोलीस उपअधिक्षक श्रीमती अनामिका मिर्झापूरे यांचे पर्यवेक्षणात पो. नि. श्रीधर भोसले, पोहवा शंकर डांगे, राजेश पदमगिरीवार, पो.अं. संदीप उडान, संदिप घोरमोडे व चापोना प्रफुल डोर्लीकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गडचिरोली यांनी केलेली आहे.
“कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ ॲन्टी करप्शन ब्युरो, गडचिरोली यांचेशी सपंर्क साधावे असे आवाहन पोलीस उपधिक्षक अनामिका मिर्झापुरे यांनी केले आहे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here