जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै ला ग्रंथ भेट

310

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा (रै) ला ग्रंथ भेट

लोकवृत्त न्यूज
ता.प्र./चामोर्शी दि. 29 :- वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रत्येक शाळेत ग्रंथदान उपक्रम राबविला पाहिजे. वाचनामुळे मुले परिसर वाचू शकतील आणि विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये नक्कीच फरक पडेल असा आशावाद वाटतो. यातून शिक्षकांना विद्यार्थ्यांच्यात वाचनाची गोडी वाढविता येईल, असे प्रतिपादन खुशाल वासेकर यांनी केले.                पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा कुनघाडा रै या शाळेत सुमारे दोनशे तीस विद्यार्थी शिक्षण घेत आहेत शाळेतील शिक्षक उपक्रमशील असून विद्यार्थ्यांची वाचनाची भूक मिटावी म्हणून शाळेतील विद्यार्थ्यांना अध्ययन समृद्धीसाठी अवांतर वाचनाची सवय लागावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी समाजातील होतकरू प्रतिष्ठित नागरिक यांचीही मदत घेतली जाते कुनघाडा येथील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी खुशाल मोरेश्वर वासेकर यांनी या उपक्रमाची दखल घेत शाळेला वेधकृती अंतर्गत प्रकाशित लेखिका रोहीणी विद्यासागर पिंपळखेडकर यांची विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी ठरणाऱ्या पुस्तकांचा संच सप्रेम भेट दिला.

या प्रसंगी कुनघाडाचे माजी सरपंच अविनाश चलाख, मुख्याध्यापिका कु गीता शेंडे , प्रमोद बोरसरे, गुरुदास सोनटक्के, अंजली तंगडपल्लीवार अनिल दुर्गे, विजय दुधबावरे , अभिषेक लोखंडे आदी शिक्षक वृंद उपस्थित होते शाळेतर्फे खुशाल वासेकर यांचे स्वागत करून आभार मानले गेले.