महावाचन उत्सव 2024 अंतर्गत आरमोरीत पुस्तक प्रदर्शनी संपन्न

244

– विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृतीला दिली चालना

लोकवृत्त न्यूज
आरमोरी दि.६ :- तालुका अंतर्गत महावाचन उत्सव 2024 चा टप्पा 2 अंतर्गत तालुकास्तरीय ग्रंथ/पुस्तक प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनी करीता प्रमुख अतिथी म्हणून कैलास टेंभुरने गटसमनवयक व कु.सुनंदा गिरिपुंजे साधन व्यक्ती उपस्थित होते. या प्रदर्शनीमध्ये 6 ते 7 पुस्तकांचे स्टॉल लावण्यात आले होते. महावाचन अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी पुस्तकांचे सारांश व्यक्त केले आणि वाचन संस्कृतीला चालना दिली.
या उपक्रमात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पाथरगोटा येथील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक निकेश बन्सोड यांच्या मार्गदर्शनाखाली पुस्तक प्रदर्शनीला भेट दिली. विद्यार्थ्यांनी संपूर्ण पुस्तकांची पाहणी करून त्यांची माहिती वहीत लिहून घेतली. पुस्तकांचा परिचय उपक्रमासाठी विद्यार्थ्यांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. या गटांमध्ये 3 ते 5 प्रथम गट, 6 ते 8 द्वितीय गट, आणि 9 ते 12 तृतीय गट असे एकूण तीन गट होते.
पाथरगोटा शाळेतील कु. देवयानी दिलीप ठाकरे इयत्ता 7 वी हिने वाचलेल्या पुस्तकाचा परिचय आणि सारांश प्रभावीपणे मांडला. उपस्थित सर्वांनी तिचे कौतुक केले आणि तिच्या वाचन कौशल्याचा गौरव केला.