Home Breaking News गडचिरोली–विसापूर मार्गावर अपघात : मुलाला वाचवताना दुचाकीस्वाराचा मृत्यू

गडचिरोली–विसापूर मार्गावर अपघात : मुलाला वाचवताना दुचाकीस्वाराचा मृत्यू

633

गडचिरोली–विसापूर मार्गावर अपघात : मुलाला वाचवताना दुचाकीस्वाराचा मृत्यू

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : गडचिरोली–विसापूर मार्गावर रविवारी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडलेल्या अपघातात मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या अपघातात कोटगल येथील संगीत मंडल (वय ५८) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, संगीत मंडल हे भाजीपाला घेऊन आपल्या दुचाकीने कोटगलकडे जात होते. दरम्यान, अचानक एक लहान मुलगा त्यांच्या दुचाकीसमोर आला. मुलाला धडक लागू नये म्हणून त्यांनी तत्काळ ब्रेक दाबले. मात्र, वेगात असलेल्या दुचाकीवर जोरात ब्रेक लागल्याने वाहनाचा तोल गेला आणि ते रस्त्यावर जोरात कोसळले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. पोलिसांनाही घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे कोटगल गावात शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मुलाचे प्राण वाचवताना एका कुटुंबाचा आधारस्तंभ हरपल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

Don`t copy text!