Home Breaking News राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात : एक गंभीर

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात : एक गंभीर

413

राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे भीषण अपघात : एक गंभीर

लोकवृत्त न्यूज
धानोरा : गडचिरोली–मुरूमगाव राष्ट्रीय महामार्गावरील जीवघेण्या खड्ड्यांनी आणखी एक बळी घेण्याची वेळ आणली आहे. कर्तव्यावर जात असताना दुचाकी मोठ्या खड्ड्यात घसरल्याने एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेमुळे परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
मुरूमगाव येथील स्वर्गीय रामचंद्र दखने विद्यालय, मुरूमगाव येथील कर्मचारी रमेश निसार (वय ४५) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सुमारे ९ वाजताच्या सुमारास आपल्या दुचाकीने (MH 33 AG 3543) गडचिरोलीहून मुरूमगावकडे कर्तव्यावर निघाले होते. गिरोला ते दूधमाळा दरम्यान रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यात दुचाकी गेल्याने ती अचानक घसरली आणि निसार हे जोरात खाली आपटले.
या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून ते काही काळ रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. स्थानिकांनी तत्काळ मदत करून त्यांना उपचारासाठी गडचिरोली येथे दाखल केले. प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने नागपूर येथे हलविण्यात आले आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांकडून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. “खड्डे बुजवण्याआधी आणखी किती जीव धोक्यात घालणार?” असा संतप्त सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Don`t copy text!