रोटरी क्लब ऑफ गडचिरोली तर्फे ॲक्युप्रेशर शिबिर व फिजिओथेरपी कॅम्प

177

– १९ ते २४ सप्टेंबर घेता येईल शिबिराचा लाभ

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : आजच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष करीत आहोत. सुदृढ शरीरष्टी व निरोगी आयुष्य राखण्याकरिता रोटरी क्लब ऑफ गडचिरोली द्वारा ॲक्युप्रेशर रिसर्च ट्रेनिंग व ट्रीटमेंट संस्थान जोधपुर राजस्थान चे विशेषज्ञ तथा फिजिओथेरपीस्ट नॅचरोपॅथी रिसर्च ट्रीटमेंट जोधपुर, थेरापिस्ट राजेंद्र सारण व चमू जोधपुर यांना गडचिरोली मध्ये नाम मात्र शुल्कात नर सेवा उपक्रम अंतर्गत लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्याचा मानस राबवित आहेत.
१९ ते २४ सप्टेंबर या पाच दिवसा दरम्यान साई मंदिर, डॉ.कुंभारे हॉस्पिटल मागे चामोर्शि रोड गडचिरोली येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिराचे उदघाटन डॉ.सोनल चेतन कोवे याच्या हस्ते करण्यात आले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ.मिलिंद रामजी नरोटे, डॉ.चेतन मारोती कोवे. रोटरीयन चार्टर्ड अध्यक्ष दिवाकर बारसागडे, माजी अध्यक्ष नंदकिशोर काबरा, रोटरी क्लब अध्यक्ष सुनिल बट्टूवार, सचिव विश्राम होकम, कोषाध्यक्ष नीरज जैन, रोटरियन राजूभाऊ ईटणकर, केतनभाई कलारिया, अमित सूचक, हेमंत राठी, गोविंद सारडा, सचिन तंगडपल्लीवार, हे उपस्थित होते.
या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ गडचिरोली द्वारा करण्यात आले आहे.