– केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांना AIMIM पक्षा तर्फे जिल्हा अधिकारी मार्फत निवेदनातून मागणी
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जिल्ह्यात सूरजागढ प्रकल्प कंपनी आणि कोन्सरी प्रकल्पामुळे जड वाहतूक खुप मोठ्या प्रमाणात वाढलेली असुन या कंपण्यातून येणाऱ्या जड वाहनांमुळे निष्पाप लोकांचे जीव गेले आहेत. या जड वाहनांना जाण्याचे मार्ग शहरातून असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. अपघातामुळे शाळेची शिक्षिका, युवकांचे, वृद्धांचे,सर्वसामान्य निष्पाप लोकांचे बळी गेले आहेत. नागपूर शहरात उड्डाण पूल अनेक बनले आहेत इतर शहरात सुद्धा उड्डाण पूल आहेत. त्याचा धर्तीवर गडचिरोली शहरात किमान एक तरी उड्डाण पूल गोगाव फाटा पासुन ते वाकडी फाटा पर्यंत आणि मुरखडा ते माडेतुकुम पर्यंत उड्डाण पूल बांधून देण्यात यावे आणि बायबास महामार्ग देऊन या गडचिरोली जिल्ह्याला न्याय मिळवून देण्यात सहकार्य करावे अशी मागणी AIMIM पक्षाचे जिल्हा अध्यक्ष बाशिद शेख, महीला जिल्हा अध्यक्ष आयशा अली सय्यद, सोशल मीडिया जिल्हा अध्यक्ष जावेद शेख, युवा नेते दिलीप बांबोळे, महीला जिल्हा सचिव शमीना शेख, शगुप्ता शेख, नसीमा शेख आदी उपस्थित होते.

