एमआयडीसी ला जागा उपलब्ध करून द्या

197

एमआयडीसी ला जागा उपलब्ध करून द्या
वृषभ गोरडवार यांची मागणी.

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०१ :- गडचिरोली जिल्ह्याच्या निर्मितीनंतर जिल्हा मुख्यालय (एमआयडीसी) औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आले . त्यानंतर जिल्ह्यातील उद्योजकांना उद्योग उभारणी करता चालना देण्यासाठी जागा वितरित करण्यात आल्या मात्र एकूण दिलेल्या जागेपैकी आजतागायत दहा टक्के उद्योजकांनी उद्योग उभे केलेले नसून सर्वच्या सर्व जागा ओस पडून आहेत. आजच्या परिस्थितीत बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात वाढलेली असून, युवकांना रोजगाराच्या संधी फार कमी प्रमाणात जिल्ह्यात उपलब्ध आहे. आणि म्हणून अशा युवकांना स्वतःचे उद्योग उभे करण्याकरिता औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यात जे भूखंड रिकामे पडलेले आहे असे सर्व औद्योगिक विकास महामंडळाने आपल्याकडे घेऊन नवीन उद्योजकांकरिता लिलाव पद्धतीने वितरित करून तथा काही नवीन जागा सुद्धा उपलब्ध करून बेरोजगार युवकांना उद्योगाकरिता चालना द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष वृषभ गोरडवार यांनी निवासी जिल्हाधिकारी यांचेमार्फत माननीय मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे केलेली आहे. यावेळी स्वप्निल मडावी, बादल गडपायले, शंतनू एनप्रेड्डीवार, नयन खामनकर, यांचे सह अनेक युवा कार्यकर्ते उपस्थित होते.