गडचिरोली नवरात्रीत  मटण मार्केट बंद राहणार

657

गडचिरोली नवरात्रीत मटण मार्केट बंद राहणार
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.०३ :- गडचिरोली शहरातील सुप्रसिद्ध कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळच्या वतीने दुर्गा उत्सव मोठया उत्साहात साजरा होणार आहे.या ठिकाणी मास विक्रीचे दुकाने आहेत. हे नवरात्रीत बंद राहणार आहे.
कारगिल चौक दुर्गा उत्सव मंडळ तर्फे दरवर्षी मोठा सहा उत्साहात येथे नवरात्र उत्सव साजरा होतो मंडळतर्फे दुर्गा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात येते.मार्केट लाईन मध्ये मोठया प्रमाणात मास विक्रीसाठी दुकान आहेत. सदर दुकान नवरात्री निमित्त बंद ठेवण्यात यावे अशी विनंती कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांनी केली. या विनंतीला मान देऊन सर्व दुकानदारानी दुर्गा उत्सव होईपर्यंत दुकान बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. यात दुकानदाराचा निर्णयचा सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे. गडचिरोली शहरांत प्रथमच मास विक्री होणार नाही आहे.