जंतनाशक गोळ्यांचे होणार वाटप

0
303

१ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना 

– १३ फेब्रुवारीला राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, १० फेब्रुवारी : राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला-मुलींना १३ फेब्रुवारीला अंगणवाडी व शाळा स्तरावर जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे यांनी दिली आहे.


गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी व चामोर्शी तालुका वगळता उर्वरित दहा तालुक्यांमधील अंगणवाड्या व शाळांमध्ये नोंद असलेले तसेच शाळाबाह्य अशा एकूण २ लाख २४ हजार १०३ बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट असून सदर मोहीम सर्व सरकारी व खासगी शाळेतील शिक्षक, अंगणवाडी सेविका, आरोग्य, आशा स्वयंसेविकांमार्फत राबविली जाणार आहे. तसेच २० फेब्रुवारी २०२४ ला मॉप अप दिनआरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत आहे.
जिल्हयात १ ते १९ वयोगटातील २ लाख २४ हजार १०३ मुले आहेत. या वयोगटातील मुलांना या परजीवी जंतापासुन आजार उदभवण्याचा धोका आहे. दुषित मातीच्या संपर्कात आल्यामुळे हा आजार सहजतेने होण्याची शक्यता असते. त्यामुळे कुपोषण, रक्तक्षय, पोट दुखी, भुक मंदावणे, अतिसार, शौच्यामध्ये रक्त पडणे, आतडयावर सुज येणे ईत्यादी समस्या निर्माण होतात.
राष्ट्रीय जंतनाशक दिनाचा उद्देश हा १-१९ वर्ष वयोगटातील सर्व मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देवून त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जिवनाचा दर्जा उंचावने हा आहे. जिल्हयात मोहिमेची अंमलबजावनी १३ फेब्रुवारी २०२४ करण्यात येणार असून जिल्हयातील मोहिमेकरीता १ ते १९ वयोगटातील पात्र लाभार्थी २ लाख २४ हजार १०३इतकी आहे. त्यामध्ये १ ते ६ वर्ष वयोगटातील अंगणवाडीतील बालके ६५ हजार ३८१, ६ ते १० वर्ष वयोगटातील बालके ५४ हजार ९८२, १० ते १९ वर्ष वयोगटातील बालके १ लाख ०३ हजार ७४०)इतकी आहे.
ही मोहीम राबविण्याकरिता कार्यरत मनुष्यबळ नोडल शिक्षक आशा अंगणवाडी सेविका असून अंगणवाडी + मिनी अंग. १७५०, नोडल शिक्षक १६८१ (शासकिय/अनुदानित शाळा १५१७, खाजगी शाळा १५१, तांत्रिक संस्था १३) आणि आशा १२२९ असे एकूण ४६६० मनुष्यबळ संख्या आहेत.
जिल्ह्यातील ३ हजार ४३१ बुथ आहेत त्यामध्ये अंगणवाडी + मिनी अंग. १७५०, शाळा १६८१ तर लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या उपलब्ध गोळयांची संख्या ६ लाख ६ हजार ७०९ आहे. सदर मोहीम १०० टक्के यशस्वी करण्याकरिता शिक्षण विभाग व महिला व बाल कल्याण विभाग सहकार्य करणार आहे.

अशी असेल औषधीची मात्रा

औषधीचे नाव : Tab Albendazole 400mg
औषधीची मात्रा : १ ते २ वर्ष वयोगट ( अर्धी गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून पाजावी.)
२ ते ३ वर्ष वयोगट ( एक गोळी पावडर करून पाण्यात विरघळून पाजावी.)
३ ते १९ वर्ष वयोगट (एक गोळी चावून खाण्यास लावावे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here