गडचिरोली : भंगार अवस्थेत असलेल्या बसेसचा प्रवाशांना धोका, बस बंद करण्याची मागणी

140

– अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोली यांच्या वतीने विभागीय नियंत्रक यांना निवेदन

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.१४ :- जिल्ह्यात भंगार अवस्थेत असलेल्या राज्य परिवहन महामंडळ च्या बसेसमुळे प्रवाशांना धोका निर्माण झाला असून त्या भंगार बस बंद करण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा गडचिरोलीच्या वतीने विभागीय नियंत्रक यांना निवेदनातून करण्यात आली आहे.
गडचिरोली व सर्व तालुक्यातील प्रवासी ग्राहक तसेच शालेय मुला-मुलींच्या सद्या सुरु असलेल्या भंगार बसेस सुरक्षिततेबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश भंगार अवस्थेतील बसेस जिल्ह्यात धावत आहे. काही प्रवासी ग्राहकांचे जीव धोक्यात आणणारे हे प्रवास आहे. त्यामुळे नागरिकांचा व शाळेतील मुला-मुलींचा आरोग्य व सुरक्षेचा प्रश्न जैसे थेच असून हा गंभीर विषय झालेला आहे. जिल्ह्यातील हजारो प्रवासी तसेच शाळेतील विद्यार्थिनी व विद्यार्थी यांना अश्या प्रकारे अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे भंगार बस हा गंभीर विषय झाला आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना व विद्यार्थ्यांना होत आहे. जिल्ह्यातील प्रवासी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुरक्षिततेच्या दृष्टीने एक छोटासा निर्णय म्हणून आपल्या आगाराच्या नवीन बसेस करिता तात्काळ उपाय योजना करून यापुढे भंगार बसेस चा वापर करू नये असे आदेश देण्यात यावे अशी मागणी विभागीय नियंत्रक अशोक वाडिभस्मे यांना निवेदनातून करण्यात आली आहे. या वेळी अध्यक्ष चंद्रकांत पतरंगे, सचिव उदय धकाते, संघटक विजय कोतपल्लीवार, अरुण पोगळे आदी उपस्थित होते.