वनपाल अडकला एसीबीच्या जाळ्यात ; २० हजारांची स्वीकारली लाच
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२४ : रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांच्या लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती २० हजारांची लाच स्वीकारताना लाचलुपत प्रतिबंधक विभागाने वन परीक्षेत्र अधिकारी कार्यालय पुराडा, उपक्षेत्र कोहका येथील वनपाल नरेंद्र सिताराम तोकलवार यास रंगेहाथ पकडल्याची कारवाई शुक्रवार २४ जानेवारी रोजी करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार पुरवठा वनपरिक्षेत्राधिकारी कार्यालय, उपक्षेत्र कोहका येथील वनपाल नरेंद्र तोकलवार याने तक्रारदार हा घरकुलासाठी ट्रॅक्टर ने रेती वाहतूक करित असताना ट्रॅक्टर थांबवून ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदार यास सदर लाच रक्कम देण्याची मुळीच इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोली येथे 23 जानेवारी रोजी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या अनुषंगाने आपणास कारवाई केली असता तडजोडीअंती 20 हजारांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने वनपरिक्षेत्र कार्यालया पुराडा समोर जागेवर रंगेहात पकडले.
याप्रकरणी आरोपी नरेंद्र तोकलवार यास ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन पुराडा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई दिगंबर प्रधान पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर परिक्षेत्र, नागपूर, सचिन कदम, अपर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र, संजय पुरंदरे,अपर पोलीस अधीक्षक ला. प्र. वि. नागपूर परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनात व चंद्रशेखर ढोले, पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि. गडचिरोली यांच्या परिवेक्षणात शिवाजी राठोड, पोलिस निरिक्षक, पोलिस निरिक्षक संतोष पाटिल, स.फौ.सूनिल पेद्दिवार, पो. हवा. शंकर डांगे, संदीप घोरमोडे, संदीप उडान, राजेश पद्मगिरवांर , प्रविण जुमनाके हितेश जेट्टिवार, म.पो.शी. जोत्स्ना वसाके, विद्या मशाखेत्री, चालक . पो हवा राजेश्वर कुमरे यांनी केली.
(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #ACB)










