गडचिरोली : कारगील चौकात ध्वजारोहन उत्साहात

77

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, :- शहरातील कारगील चौक येथील स्मारक येथे ७६ व्या प्रजासत्ताक दिनी मोठ्या उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. यावेळी शालेय विद्यार्थी तथा प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कारगील चौक दुर्गा उत्सव मंडळ चे अध्यक्ष उदय धकाते यांच्या मार्गदर्शनात उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन यांच्या हस्ते कारगील स्मारकवर ध्वजारोहनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी कारगील चौक चे अध्यक्ष उदय धकाते, उपाध्यक्ष रेवनाथ गोवर्धन हे उपस्थित होते.
दरम्यान स्थानिक गुरुदेव उच्च श्रेणी प्राथमिक शाळा, राजीव गांधी प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी यांनी आकर्षक समूह नृत्य सादर केले. शिक्षक तुषार निकुरे मार्गदर्शनात यांनी संचलन केले.
ध्वजरोहन कार्यक्रम प्रसंगी प्रकाश भांडेकर, प्रकाश धकाते, विनोद काटवे, राकेश कटारे, संजय गद्देवार, महेंद्र मसराम, भांडेकर, पुरुषोत्तम शेंडे, बाळू मोटघरे, रामचंद्र हजारे, महादेव कांबळे, मोतीराम हजारे, संजय मेश्राम,किशोर सोमनकर,बांबोळे सर, सुचिता धकाते,प्रमिला कुंभारे, स्मिता दुधे, वनिता धकाते, श्रीमती गुरुनुले आदी प्रतिष्ठित नागरिक तथा शिक्षक, शिक्षिका विद्यार्थी उपस्थित होते.