बांधकाम कामगार आता आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील अर्ज

526

– कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्वतः कार्यालयात हजर रहावे लागेल
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : बांधकाम कामगार आता आपले नोंदणी , नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकणार आहेत. तशी सूचना मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
बांधकाम कामगारांना आपले नोंदणी , नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन सादर करावे लागते. यापूर्वी तालुका सुविधा केंद्र कार्यालयातून हे अर्ज ऑनलाईन भरल्या जात होते आता मात्र त्यात बदल करण्यात आले असून ५ फेब्रुवारी २०२५ पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एन्ट्रीचे काम बंद करण्यात आले आहे. कामगारांना आपल्या सोयीच्या जागेवरून नोंदणी , नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन भरता येणार आहे. सादर अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागणार आहे. निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रांसह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर रहावे लागणार आहे, त्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येणार आहे.
सोयीच्या जागेवरून अर्ज भरण्याची सुविधा करण्यात आल्याने आता कामगारांना अधीक सोयीचे होणार आहे.