लोकवृत्त न्यूज
सावली : वाघाने हल्ला करून युवकाला जखमी केल्याची घटना गुरुवार १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास सावली तालुक्यातील व्याहाड बूज नजीकच्या नवतलाव रोड केरोडा शांतिनगर येथे घडली. विनोद मांडवकर, रा. गव्हारला असे वाघाच्या हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.
व्याहाड खुर्द – केरोडा परिसरात वाघाचा वावर मागील काही वर्षांपासून असून वन्यप्राण्याच्या हल्यात जखमी, मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान आज सकाळी विनोद मांडवकर या युवक नवतलाव रोड केरोडा शांतिनगर परिसरात जात असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला चढवला. वाघाने हल्ला केल्यानंतर आरडाओरड केल्याने वाघ पळून गेला मात्र यात युवक विनोद मांडवकर हा जखमी झाला. घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे. या घटनेने परिसरात दहशत पसरली असून वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

