देसाईगंज : दहावी – बारावीचे परीक्षा काळात शहरात कार्यक्रमांचा गोंगाट

144

– पंतप्रधान मोदी यांच्या सल्लाला तिलांजली, आयोजकांना परीक्षेचा विसर

लोकवृत्त न्यूज
देसाईगंज दि.२८ फेब्रुवारी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या 200 मीटर परिसरात मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये हा आदेश जारी केला आहे. मात्र या काळातही अनेक ठिकाणी आयोजांकडून विविध कार्यक्रम घेण्यात येत असल्याने आवाजाचा गोंगाट तयार होत असून विद्यार्थ्यांनी अभ्यास तरी कसा करावा असा प्रश्न उपस्थित होत असून केवळ परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करून होणार काय ? यानिमित्ताने विद्यार्थ्यांच्या अभ्यासा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
देसाईगंज शहरातील कस्तुरबा वॉर्डमध्ये आज रात्री हंगामाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळपासून या ठिकाणी गाण्यांचा गोंगाट सुरू आहे. “परीक्षांचा ताण न घेता वेळेचे योग्य नियोजन करुन सकारात्मकतेने अभ्यासावर लक्ष केंद्रित करा ” असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दहावी, बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना दिला होता. मात्र अशा शहरात होणाऱ्या विविध कार्यक्रमाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा प्रश्न ऐरणीवर आला असून पंतप्रधान मोदी यांच्या सल्ल्यावर कार्यक्रम आयोजकांकडून पाणी फेरले जात आहे.
केवळ देसाईगंज शहरातच नव्हे तर जिल्ह्यातील इतरही गावात, शहरात परीक्षा कालावधीत हंगामा, नाटक,तसेच इतर गोंगाट करणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहेत. परीक्षा कालावधीत अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी कोण देतेय असा देखील प्रश्न या निमित्त उपस्थित होत असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर याचा परिणाम होत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायचा तरी कसा, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सल्ल्याचे काय असा देखील प्रश्न उपस्थित होत असून वेळीच यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #SSC #)