असोसिएशन ऑफ स्मॉल अँण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटना, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मुंबई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ व आदी पत्रकार संघटनांच्या मागणीला यश

0
157

शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीमध्ये ५० कोटींची तरतूद

कल्‍याण निधी आता १०० कोटींवर

लोकवृत्त न्यूज
मुंबई दि. ९ मार्च:- असोसिएशन ऑफ स्मॉल अँण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटना, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद मबई, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ व आदी पत्रकार संघटनांच्या पाठपुरावा व मागणीनुसार स्व. शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत 50 कोटीची वाढ करण्याची घोषणा आज दि.09 रोजी अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केली.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेच्या महाराष्ट्र शाखेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष के
डी.चंडोला, राष्ट्रीय उपाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, राष्ट्रीय सचिव प्रवीण पाटील, एन.सी. मेंबर तथा डी.ए.व्हि.पी.कमिटीचे सदस्य चंद्रशेखर गायकवाड, राज्याध्यक्ष प्रदीप कुलकर्णी, कार्याध्यक्ष सुमित कुलकर्णी, राज्य सचिव मारोती गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्याचे उपाध्यक्ष भिका चौधरी यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दि.13 नोव्हेंबर 2022 रोजी खान्देश दौऱ्यावर आले असता नंदुरबार येथे राज्याचे उपाध्यक्ष भिका चौधरी यांनी आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, भाजपचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजयभाऊ चौधरी, नंदुरबारच्या खासदार डॉ.हिना गावित, माजी आमदार शिरीषदादा चौधरी, भाजपचे ॲड.किशोरभाऊ काळकर यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांच्या विविध मागण्यांचे निवेदन दिले होते. यात विशेषतः पत्रकारांच्या पेन्शन योजनेसाठी शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीत येणाऱ्या आर्थिक बजेटमध्ये 100 कोटींची तरतूद करण्यात यावी यासाठी आपण (चंद्रशेखर बावनकुळे) अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण शब्द खर्च करून 100 कोटींची तरतूद करून घ्यावी व पत्रकारांना न्याय मिळवून द्यावा अशी विनंती केली होती. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांच्या न्याय मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करून पत्रकारांच्या मागन्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन असोसिएशन ऑफ स्मॉल अँण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेचे राज्य उपाध्यक्ष भिका चौधरी यांना दिले होते. याच धर्तीवर आजच्या बजेट मध्ये शंभर टक्के जरी न्याय मिळाला नसला तरी पन्नास टक्के न्याय मिळाला म्हणजे 50 कोटींची तरतूद झाल्याने पत्रकार सन्मान योजनेसह पत्रकारांच्या विविध मागण्या यानिमित्ताने पूर्ण होतील अशी अपेक्षा करू या.
असोसिएशन ऑफ स्मॉल अँण्ड मिडियम न्यूज पेपर्स ऑफ इंडिया संघटनेतर्फे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह भाजपा – सेनेचे मंत्रीगण यांचे आभार.

मराठी पत्रकार परिषदेच्या पाठपुराव्यालाही यश

या संदर्भात मराठी पत्रकार परिषदेनेही वेळोवेळी पाठपुरावा केला होता त्यांच्या या मागणीनुसार स्व.शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधीच्या ठेवीत आणखी ५० कोटींची वाढ करण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करतांना केली आहे. त्यामुळे ठेवीतील रक्कम आता १०० कोटी झाली आहे. या ठेवीच्या व्याजातून पत्रकार आरोग्य योजना आणि पत्रकार सन्मान योजना चालविल्या जातात. ठेवीतील रक्कम वाढविल्यामुळे पत्रकार सन्मान योजनेचा लाभ आता अधिकाधिक जेष्ठ पत्रकारांना मिळेल अशी अपेक्षा मराठी पत्रकार परिषदेने व्यक्त केली असून अधिक ५० कोटींच्या घोषणेबद्दल मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने धन्यवाद दिले आहेत.

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या मागणीलाही यश

या संदर्भात मागील महिन्यात मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने देखील प्रमोद डोईफोडे अध्यक्ष, महेश पवार उपाध्यक्ष, प्रवीण पुरो कार्यवाह, विनोद यादव कोषाध्यक्ष, कार्यकारिणी सदस्य
आलोक देशपांडे, मनोज मोघे, कमलाकर वाणी, खंडुराज गायकवाड, भगवान परब यांच्या नेतृत्वात संबंधितांना निवेदन दिले होते. आचार्य बाळशास्‍त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेंतर्गत स्‍वर्गीय शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्‍सवी पत्रकार कल्‍याण निधीच्या व्याजातून ज्‍येष्‍ठ पत्रकारांसाठी सन्मान योजना राबविण्यात येते. या निधीमध्ये भरीव वाढ करण्यात यावी अशी मागणी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या निधीत ५० कोटींची भर घालण्यात आल्‍याची घोषणा आज अर्थसंकल्‍पात केली आहे. यामुळे ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निवृत्‍तीवेतन मिळणे अधिक सुकर होणार आहे. आजच्या या घोषणेमुळे हा निधी आता १०० कोटींपर्यंत पोहोचला आहे. अर्थव्यवस्‍थे समोर मोठे आव्हान असतानाही ज्‍येष्‍ठ पत्रकारांना निधी उपलब्‍ध करून दिल्याबद्दल
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here