पक्ष्यांसाठी श्री फाउंडेशनतर्फे महावीर जयंतीनिमित्त २०० मातीची भांडी दान

264

– “प्यासे पंछीयो को पानी पिलाए, आओ इस आदत को संस्कार बनाए” असा प्रेरणादायी संदेश

लोकवृत्त न्यूज:-
गडचिरोली : वाढत्या उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईने मानवासोबतच पक्ष्यांनाही त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर “प्यासे पंछीयो को पानी पिलाए, आओ इस आदत को संस्कार बनाए” असा प्रेरणादायी संदेश देत श्री फाउंडेशनच्या वतीने महावीर जयंतीच्या निमित्ताने दिनांक १० एप्रिल २०२५ रोजी २०० पेक्षा अधिक मातीची भांडी विविध ठिकाणी दान करण्यात आली.
ही भांडी नागरिकांना मोफत वाटप करून त्यांना आपल्या घरासमोरील किंवा सार्वजनिक ठिकाणी पाणवठे ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. या उपक्रमामध्ये श्री फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
या उपक्रमावेळी श्री फाउंडेशनच्या अध्यक्षा इंजी. पायल कोडापे, उपाध्यक्षा भाग्यश्री गडमवार, सचिव मंजू कोडापे, कोषाध्यक्षा सरिता चुधरी, तसेच प्रनोती बनकर, रूपा दुलमावर, वैशाली मुनघाटे, मिथिला धांडे, शरयु चौके, स्वाती करपे, मंजुषा इरमिरवार, संध्या पवार, सविता डोमळे, प्रीती पवार, निशा ढोरे, प्रिया खेडेकर व इतर सदस्य उपस्थित होते.
या समाजोपयोगी उपक्रमाचे शहरवासीयांनी मनापासून स्वागत केले असून, अशा उपक्रमांनी सामाजिक संवेदनशीलतेचे सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #Shri Foundation )