लोकवृत्त न्यूज
गडचिरोली ९ एप्रिल :- नक्षलवादी शासनविरोधी विविध घातपाती हिंसक कारवाया करण्यासाठी विविध प्रकारचे शस्त्र वस्फोटक साहित्यांचा वापर करतात व ते साहित्य सुरक्षा दलांना धोका पोहचविण्याच्या उद्देशाने गोपनियरित्या जंगल परिसरात जमिनीमध्ये पुरुन ठेवतात. अशा पुरुन ठेवलेल्या साहित्यांच्या वापर नक्षलवाद्यांकडुन नक्षल सप्ताह तसेच ईतर प्रसंगी केला जातो.
दिनांक ०७/०४/२०२३ रोजी सकाळी ११:०० ते १२:०० वा. दरम्यान उपविभाग धानोरा अंतर्गत पोमके गैरापत्ती हद्दीतील टिपागड जंगल परिसरात मिळालेल्या गोपनिय ख़बरीच्या आधारे गॅरापत्ती पोलीस पार्टी व सिआरपीएफ चे जवान नक्षल विरोधी अभियान राबवित असतांना जवानांना नुकसान पोहचवण्याच्या उद्देशाने संशयीत ठिकाणी लपवुन ठेवलेले नक्षल साहित्य शोधुन काढण्यात पोलीस जवानांना यश आले. मिळुल आलेल्या डॅम्पमध्ये १२ बोर रायफल, देशी बनावटीचे ०२ स्फोटके, नक्षल लिखाण साहित्य, बॅनर, शुज व ईतर दैनंदिन वापराचे साहित्य हस्तगत करण्यात आले.
सदर कामगिरी मा. पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा. मा. अपर पोलीस अधीक्षक यतिश देशमुख सा. (अहेरी) व उपविभागीय पोलीस अधिकारी धानोरा स्वप्नील जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली. अभियानात सहभागी असलेल्या गॅरापत्ती पोलीस पार्टीच्या जवानांचे मा. पोलीस अधीक्षक सा. यांनी कौतुक केले आहे. तसेच जिल्हाभरात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्याचे सांगितले असुन, नक्षलवाद्यांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करुन सन्मानाने जिवन जगण्याचे आवाहन केले आहे.