पहलगाम हल्ल्याचा अ.भा.वि.प. गडचिरोली जिल्हा वतीने तीव्र निषेध

122

– “तुम धर्मवाद से तोड़ोगे, हम राष्ट्रवाद से जोड़ेंगे”
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) गडचिरोली जिल्हा वतीने तीव्र निषेध करण्यात आला. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निरपराध नागरिकांच्या कुटुंबीयांच्या आक्रोशाने संपूर्ण देश हादरला आहे.

इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे आयोजित शोकसभेत हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानचा जाहीर निषेध करण्यात आला. या प्रसंगी अभाविप विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र मुनघाटे, विदर्भ प्रांत सहमंत्री अभिलाष कुनघाडकर, नगराध्यक्ष प्रा. सुनीता साळवे, प्रांत कार्यकारिणी सदस्य प्रणय मस्के, नगरमंत्री विकास बोदलकर, धानोरा नगरमंत्री संकेत मस्के, जिल्हा मिडिया प्रमुख करण चौधरी, शुभम कुनघाडकर, जिल्हा संघ चालक घुसुलालजी काबरा, तसेच प्रशांत भ्रृगवार, अनिल पोहनकर, स्वरूप तारगे, दीपक बोटरे, हर्षल गेडाम यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

“तुम धर्मवाद से तोड़ोगे, हम राष्ट्रवाद से जोड़ेंगे” या घोषवाक्याखाली पार पडलेला हा श्रद्धांजली आणि निषेध कार्यक्रम राष्ट्रप्रेमाने भारलेला होता.