सिरोंचात महसूल विभागाची मोठी धडक कारवाई : गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणारे 15 ट्रॅक्टर जप्त

134

सिरोंचात महसूल विभागाची मोठी धडक कारवाई : गोदावरी नदीपात्रातून अवैध रेती वाहतूक करणारे 15 ट्रॅक्टर जप्त

लोकवृत्त न्यूज
सिरोंचा : गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध रेती तस्करीवर महसूल विभागाने मोठी धडक कारवाई करत तब्बल १५ ट्रॅक्टर जप्त केले. या कारवाईमुळे अवैध रेती तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, आज पहाटेच्या सुमारास मद्दीकुंटा (ता. सिरोंचा) येथील नदीपात्रात अवैध रेती वाहतुकीसाठी वापरले जात असलेले ट्रॅक्टर कार्यवाही दरम्यान आढळून आले. प्रभारी तहसीलदार हमीद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीनिवास तोटावार यांनी पथकासह धाड टाकून कारवाई केली.
कारवाईदरम्यान नदीपात्रात १५ ट्रॅक्टर अवैधपणे रेती वाहतूक करताना आढळले, जे तात्काळ जप्त करून सिरोंचा तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. सध्या पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईमुळे अवैध रेती तस्करी करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, महसूल विभागाच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्थानिक पातळीवर या कारवाईमुळे अवैध रेती उपशावर रोख बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra #accident )