१०,००० क्विंटल धान घोटाळा : गडचिरोलीत अध्यक्ष-उपाध्यक्ष अटकेत, १० आरोपी फरार

985

१०,००० क्विंटल धान घोटाळा : गडचिरोलीत अध्यक्ष-उपाध्यक्ष अटकेत, १० आरोपी फरार

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील देऊळगाव खरेदी केंद्रावर तब्बल १०,००० क्विंटल धान गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. २०२३-२४ आणि २०२४-२५ या काळात सरकारी खरेदी प्रक्रियेत मोठा अपहार झाल्याचे समोर आले असून, अध्यक्ष पतिराम कोकोडे, उपाध्यक्ष पंढरी दादगाये व तीन संचालकांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी एकूण १७ जणांवर IPC कलमांतर्गत गुन्हा दाखल असून, पोलिस तपासाखालील यादीत अधिकारी व कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. यामध्ये प्रभारी निरीक्षक चंद्रकांत कासारकर व हितेश पेंदाम यांना याआधीच अटक झाली आहे. उर्वरित १० आरोपी अद्याप फरार आहेत.
जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी याची गंभीर दखल घेत तपास अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. कृषी खरेदी व्यवस्थेतील ही बेधडक फसवणूक केवळ आर्थिक अपहार नसून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार आहे.