केंद्र सरकारच्या योजना गोर गरिबांपर्यंत पोहोचवा. – माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी

66

विकसित भारतासाठी भाजपचा संकल्प : देसाईगंजमध्ये संकल्प सभा उत्साहात पार

लोकवृत्त न्यूज
वडसा, २१ जून : देसाईगंज येथील सिंधु भवनमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने “विकसित भारत संकल्प सभा” मोठ्या उत्साहात पार पडली. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळातील यशस्वी योजनांचा आढावा घेण्यासोबतच, देशाच्या समृद्धीचा संकल्प या कार्यक्रमातून पुन्हा अधोरेखित करण्यात आला.
या संकल्प सभेत मार्गदर्शन करताना भाजप नेत्यांनी केंद्र सरकारच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा उल्लेख केला. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री आवास योजना, उज्ज्वला योजना, जल जीवन मिशन, सुरक्षा विमा योजना, तसेच जनधन योजना यांसारख्या उपक्रमांचा लाभ गरजूंना पोहचत असून, या योजनांमुळे सामान्य जनतेच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“गरिब, शेतकरी, महिला आणि वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे. शासनाच्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन यावेळी माजी आमदार डॉ.नामदेवराव उसेंडी वक्त्यांनी केले.
या कार्यक्रमात माजी आमदार कृष्णाजी गजबे, माजी जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, भाजपा कि.मो. प्रदेश सचिव रमेशजी भुरसे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खट्टी, वडसा तालुकाध्यक्ष सुनीलजी पारधी, तसेच महिला व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#SankalpSeSiddhi #BJP4ViksitBharat #BJPGovernment #BJP4IND #BJP4Maharashtra