गडचिरोली महिला रुग्णालयात सुविधा वाढवा – मनसेच्या शिष्टमंडळाची प्रभावी मागणी

166

गडचिरोली महिला रुग्णालयात सुविधा वाढवा – मनसेच्या शिष्टमंडळाची प्रभावी मागणी

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली दि.२७ : जिल्ह्यातील महिला रुग्णांना भेडसावत असलेल्या आरोग्य सुविधांअभावी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने गडचिरोली सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्सक यांना निवेदन सादर करत तातडीने सुधारणा करण्याची मागणी केली.

महिला रुग्णालयात सध्या बेड्सची संख्या अपुरी असून, त्यामुळे गंभीर व सामान्य रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रुग्णालयात बेड्सची संख्या वाढवावी, रुग्णांकडे विशेष लक्ष द्यावे व उपचार पद्धतीत आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, अशा मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला.

या शिष्टमंडळात मनसे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, मनविसे जिल्हा उपाध्यक्ष इंजि. अंकुश संतोषवार, शहराध्यक्ष शुभम कमलापूरवार, उपशहराध्यक्ष आशिष खडसे, सचिव आकाश कुळमेथे, तसेच कार्यकर्ते पवन कोसणकर आणि प्रसाद आसमवार सहभागी झाले होते.

या वेळी प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद देत, सदर मागण्यांवर लवकरच आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @मनसे #RajThackeray #आरोग विभाग )