चक्क चालू विद्युत खांबावर बॅनर होर्डिंग ; महावितरणचे दुर्लक्ष

0
823

– लोकप्रतिनिधिंना नियमांचा विसर
लोकवृत्त न्यूज
गडचिरोली 8 जानेवारी : बॅनर होर्डिंग च्या माध्यमातून शुभेच्छा देणे, स्वतःची प्रसिद्धी करण्याचा अनेकांना छंदच लागलेला आहे. आता बॅनर होर्डिंग लावणे म्हणजे काही मोठी गोष्टही राहिली नाही. गडचिरोली शहरातील मुख्य चौकात अनेक ठिकाणी लावलेल्या बॅनर ने बॅनर्स ची स्पर्धाच रंगल्याचे दिसून येते. तर मुख्य मार्गावरील काही चालू विद्युत खांबावर बॅनर होर्डिंग लावल्याचे दिसून येत असून याकडे मात्र महावितरनचे दुर्लक्ष दिसून येत आहे. तर लोकप्रतीनिधींना सुद्धा नियमाचा विसर होतांना दिसून येत आहे.
गडचिरोली शहरातील धानोरा मार्गावरील महावितरणच्या एका चालू विद्युत खांबावर आमदाराचा शुभेच्छा होर्डिंग लावल्याचे दिसून येत आहे. अनेक दिवसांपासून या खांबावर बॅनर लावतांना दिसून येत असल्याने या असल्याप्रकारे बॅनर होर्डिंग लावणे वैध आहे काय ? असा सवाल उपस्थित होत आहे. चक्क आमदाराच्या बॅनर खांबावर लावला असल्याने त्यावरवर महावितरण कारवाई करणार काय ? महावितरणची बॅनर होर्डिंग खांबावर लावण्यास मुकसंमती तर नाही ? असा देखील सवाल उपस्थित होत आहे. आमदाराचा बॅनर होर्डिंगच त्याठिकाणी अनेक दिवसांपासून विविध सण उत्सव, आंदोलने व इतर प्रकारांचे बॅनर हिर्डिंग लावण्यात येत असल्याने महावितरणने आमदाराला विद्युत खांब आंदण तर दिले नाही, सामान्यांना वेगळे नियम आणि लोकप्रतिनिधी, आमदारांना दुसरे नियम आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होते. यावरून महावितरण केवळ वीज चोरी कुठून होते, कोणाचे वीजबिल थकीत आहे, थकीत असेल तर वीज कट करणे याकडे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे. मात्र चालू खांबावर लावण्यात आलेल्या बॅनर वर मात्र कोणतीही कारवाई करत नाही हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here