बारावी बोर्ड परीक्षेमध्ये शहरटाकळी कनिष्ठ महाविद्यालयाने मिळविले घवघवीत यश…!

0
132

लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ, पुणे यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा २०२३ चा कला व विज्ञान या दोन्ही शाखेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथील शहरटाकळी कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल १००% लागला आहे. तर कला शाखेचा निकाल ९४.२८% इतका लागला आहे. बारावी विज्ञान शाखेतून एकूण ६० विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट होते तसेच सर्व विद्यार्थी चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.तर बारावी कला शाखेतून एकूण ३५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. विज्ञान शाखेतील निंबाळकर ओंकार अरुण याने ८३.६७% गुण मिळवत विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला,पिसुटे ऋतुजा ज्ञानेश्वर ८१.५०% गुणांसह द्वितीय, तर मुके सुहानी शिवाजी हिने ८१.१७% गुण मिळवत विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे. तसेच कला शाखेमध्ये माळवदे मयुरी गोरख हिने ८१.५०% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर माळवदे आकांक्षा हरिभाऊ ७७.८३% गुणांसह‌ द्वितीय व नागे प्रतीक्षा मच्छिंद्र हिने ७६.००% गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला आहे. शहरटाकळी कनिष्ठ महाविद्यालयाने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली असल्याचे विद्यालयाचे कर्तव्यदक्ष प्राचार्य संपतराव दसपुते यांनी सांगितले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना अध्यापन करणाऱ्या प्राध्यापकांचे कर्मयोगी आबासाहेब काकडे शैक्षणिक समूहाचे अध्यक्ष ॲड. डॉ.विद्याधरजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे,संस्थेचे विश्वस्त पृथ्वीसिंह काकडे,मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मणराव बिटाळ, विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते पर्यवेक्षिका सौ.अंजली चिंतामण, संस्था प्रतिनिधी अनिल मगर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील पालक व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here