रामनवमीच्या उत्सवानिमित्त आलापल्लीत शोभायात्र

0
169

माजी जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी घेतले दर्शन..!!

लोकवृत्त न्यूज
आलापल्ली ३१ मार्च: – संपूर्ण देशात रामनवमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा हा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जात आहे.सायंकाळच्या सुमारास आलापल्ली शहरात शोभायात्रा काढण्यात आली. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी शोभायात्रेत सहभागी होत श्रीरामाचे पूजा अर्चना करत दर्शन घेतले..!!

अहेरी विधानसभा क्षेत्रात आलापल्ली हे शहर मध्यवर्ती ठिकाण म्हणून ओळखले जाते.याठिकाणी विविध सण मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरे केले जातात.रामनवमी निमित्त रामभक्तांनी कालपासूनच शहरात तयारी केली होती.आज सकाळपासून विविध कार्यक्रम घेत सायंकाळच्या सुमारास भव्य शोभायात्रा काढली. हाती भगवे ध्वज,भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक,युवती तसेच परिसरातील नागरिक या शोभायात्रेत सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी आलापल्लीकरांनी या रॅली व शोभायात्रेचे स्वागत केले.राम मंदिरातून निघालेली शोभायात्रा विर बाबूराव चौक,बस स्टँड चौक,श्रीराम चौक आणि वि.दा. सावरकर चौक परत तिथेच समापन झाले.यावेळी डिजेच्या तालावर महिला, पुरुष,युवक,युवती एकच जल्लोष केले. तर,चिमुकल्यांनी सुद्धा लेझिम द्वारे सर्वांना मंत्रमुग्ध केले.विशेष म्हणजे आलापल्ली शहरात हजारो रमाभक्तांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा पार पडली.यावेळी शहरात आनंदमय आणि भक्तिमय वातावरण दिसून आले..!!

यावेळी युवराज कंकडालवार, अहेरी नगरपंचायतचे नगरसेवक प्रशांत गोडसेलवार, पुणेश कांदिकुरवा,अमित येणप्रेड्डीवार, कार्तिक तोगम, राकेश सडमेक, नरेंद्र गर्गम, प्रकाश दुर्गे,सुरेश गड्डमवार,संतोष अग्रवाल,संतोष येंनगांटीवार,सतीश आत्राम माजी सरपंच,हंनमय्या काकाजी,टिकी आत्राम, रवी भोयर, राकेश कुळमेथे,शोभन,सलीम शेख,रमेश डोके,रवीभाऊसह आविसं अजयभाऊ मित्रा परिवारचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here