भीषण अपघातात एकजण जागीच ठार

0
683

लोकवृत्त न्यूज
सावली 25 सप्टेंबर:- चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील चिमढा नदी जवड दुचाकी व चारचाकी वाहनांची सामोरा सामोर धडक होऊन झालेल्या अपघातांत एक जन जागीच ठार झाल्याची घटना 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारात घडली. शुभम निलंकट नरुले वय 23 रा.रुद्रापूर ता. सावली जि. चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
प्राप्त माहीतीनुसार एमएच २४बीव्ही ७३८४ क्रमांकाचे चारचाकी वाहन गडचिरोली मार्गे मूल ला जात होते, दरम्यान मूल जवळील चिमढा नदीनजीक एम एच ३४ बीजी ६८४६ क्रमांकाच्या दुचाकी वाहनास जबर धडक दिली यात दुचाकीस्वार शुभम चा जागीच मृत्यू झाला. घडनेची माहिती मिळताच घटना थळी मुल पोलिस दाखल झाले याप्रकरणी चारचाकी वाहन चालक खोब्रागडे याला वाहनासह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.
मृतक शुभम हा शिक्षण घेत होता, कुटुंबात एकुलता एक मुलगा असल्याने त्यांच्या अचानक झालेल्या अपघाताती निधनाने शुभमच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here