जनशक्ती विकास आघाडीच्या लढ्याला मोठे यश…

0
85

 

लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर साखर कारखान्याला कपात केलेले प्रतिटन १०९ रु व्याजासह परत देण्याचे आदेश

लोकवृत्त न्यूज
अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी:आफताब शेख
संपर्क.७४९८३४३१९६

ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सन २०२१-२२ सालीच्या उस गळीत हंगामातील रु.१०९/- प्र.मे.टन प्रमाणे कपात केलेली रक्कम व्याजासह शेतकऱ्यांना त्वरित परत करावी असा निकाल प्रादेशिक सहसंचालक यांनी दि.२५ रोजी दिला असल्याची माहिती जनशक्तीचे संस्थापक ॲड.डॉ. शिवाजीराव काकडे यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. यावेळी काकडे म्हणाले की, ऊस उत्पादकांच्या विविध मागण्यांसाठी जनशक्ती विकास आघाडीने भातकुडगाव येथे ऑक्टोबर २०२२ मध्ये शेतकऱ्यांचा भव्य मेळावा घेऊन त्यामध्ये ही प्रमुख मागणी केली होती. तसेच ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे अनाधिकृतपणे कपात केलेली प्रतिटन १०९/- रु शेतकऱ्यांना त्वरित मिळावी यासाठी भागचंद कुंडकर, सुनील गवळी, भाऊसाहेब राजळे, मनोज घोंगडे यांच्यासह जनशक्तीच्या कार्यकर्त्यांनी हनुमान मंदिर शहरटाकळी येथे जाहीर प्राणांतिक उपोषण केले होते. त्यावेळी साखर संचालक यांनी तोंडी आश्वासन शेतकऱ्यांना दिले होते त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने जनशक्ती विकास आघाडीने प्रादेशिक सहसंचालक नगर यांच्याकडे तक्रार करून १०९/- रु प्र.मे.टन प्रमाणे कपात केलेली रक्कम शेतकऱ्यांना त्वरित परत करावी ही मागणी लावून धरली. त्याचे रितसर हिरिंग घेण्यात आली. यावेळी कारखान्याने सदर कपात रक्कम परत देता येणार नाही ती ठेवीमध्ये वर्ग केले आहे व कारखान्याने जनरल मिटिंगमध्ये तसा ठरावही घेतला आहे असे सांगितले. तर शेतकऱ्यांच्या वतीने ॲड.शिवाजीराव काकडे यांनी कारखान्याला शेतकऱ्यांची रु. १०९/- एफ.आर.पी. मधून परस्पर कपात करता येत नाही. कारखान्याने शेतकऱ्यांच्या कारखान्यावर ऊस नोंदीसाठी म्हणून घेतलेल्या सह्याचा गैरवापर केला. कारखान्याने केलेला करारनामा जनरल करारनामा आहे. कारखान्याने उस नोंदणी व पुरवठा करारनाम्याचे अनुषंगाने संदर्भाने स्वतंत्रपणे करारनामा केलेला नाही. प्रत्येक पानावर शेतकऱ्यांची सही नाही असे अनेक मुद्दे ॲड.शिवाजीराव काकडे यांनी स्वतः मांडले. त्यावर प्रादेशिक साखर सहसंचालक अहमदनगर यांनी ऊस उत्पादकांच्या ठेवीचा प्रति टन रुपये १०९ प्रमाणे व्याजासह परत करण्याचे आदेश लोकनेते मारुतराव घुले ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिले आहेत. हा निकाल लागताच परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला व जनशक्ती विकास आघाडीचे आभार मानले. ज्या शेतकऱ्यांना एफ.आर.पी.कपात रक्कम १०९ रु प्रमाणे हवी, त्यांनी जनशक्ती संघटनेशी संपर्क साधावा असेही म्हंटले आहे. या प्रश्नासाठी दत्तात्रय बोरुडे, लक्ष्मण कांबळे, पंढरीनाथ राजळे, ज्ञानदेव गवळी, रूपाली गवळी, अभिषेक गवळी, ताराबाई गवळी, गंगुबाई गवळी, राजेंद्र बनकर, संजय खंडागळे, कैलास पवार, बाळासाहेब खराडे, अरुण आपसेटे, शिवाजी शितोळे, भाऊसाहेब शितोळे, गणपत शितोळे, गंगाधर वाघ, कैलास राजळे, राजेंद्र चव्हाण, राजेंद्र ओव्हळ, सूर्यकांत गवळी, गोविंद वाघ, राजेंद्र खंडागळे, दादासाहेब मिसाळ, नामदेव बोरुडे, प्रकाश खंडागळे अशा ५० लोकांनी स्वखर्चाने पदरमोड करून लढा दिला. त्यांचे सौ.हर्षदा काकडे, जगन्नाथ गावडे, सुरेश चौधरी, देविदास गिर्हे, संभाजी फसले, माणिक गर्जे, लक्ष्मण पातकळ, राजेंद्र पातकळ, हरिभाऊ फाटे, सतीश दसपुते, गुलाब दसपुते, बाबासाहेब म्हस्के, अकबर भाई शेख, आबासाहेब काकडे, अशोक ढाकणे, शंकर काटे, वैभव पूरनाळे, रघुनाथ सातपुते, नामदेव ढाकणे, दादा दिवटे आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here