खाजगी डॉक्टरकडून तरुणीचा लैंगिक छळ

789

– आरोपी अटकेत

लोकवृत्त न्यूज
कोरची, ता. २ जुलै – उपचारासाठी डॉक्टरकडे गेलेल्या २६ वर्षीय तरुणीवर खाजगी डॉक्टरने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोरची तालुक्यातील बोरी येथे घडली. छत्तीसगड राज्यातील पीडित महिला जुलाबाच्या त्रासासाठी भावासह बोरी गावातील डॉ. सुभाष हरिप्रसाद बिस्वास (वय ४८) याच्या दवाखान्यात गेली असता, आरोपी डॉक्टरने तपासणीच्या नावाखाली तिच्यावर अश्लील चाळे केले.
डॉक्टरने पीडितेला चेकअप बेडवर झोपवून पोटावर हात ठेवत तपासणी सुरू केली. त्यानंतर वाईट उद्देशाने वैयक्तिक प्रश्न विचारत अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली असता पीडितेने आरडाओरड करताच बाहेर थांबलेला तिचा भाऊ धावत आला. त्याने डॉक्टरशी झटापट करत बहिणीची सुटका केली.
त्यानंतर पीडितेने पोमके बेळगाव येथे तक्रार दाखल केली. ऑकरन्स क्र. ६/२०२५ अन्वये गुन्हा नोंदवून कोरची पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे. पोलीस निरीक्षक शैलेश ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
या संतापजनक घटनेनंतर जिल्हाभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

(#lokvrutt.com @lokvruttnews #lokvruttnews #gadchirolinews #Maharashtra @gadachiroli police #crime #naxal )