धक्कादायक ! साडेचार वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग ; देसाईगंजमध्ये संतापाची लाट

488

– आरोपीला अटक; पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

लोकवृत्त न्यूज
देसाईगंज, ता. १७ :– साडेचार वर्षीय निष्पाप चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याची संतापजनक घटना देसाईगंज तालुक्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला असून, स्थानिकांत तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
प्रमोद मनसाराम सहारे (वय ४०, रा. देसाईगंज तालुका) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने चिमुकलीला शेजारच्या घरात बोलावून तिचा विनयभंग केला. पीडितेच्या आईने तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
त्यानुसार, देसाईगंज पोलिसांनी आरोपीविरुद्ध पोस्को कायद्याच्या कलम ८ सह बाल न्याय (बाल संरक्षण) अधिनियम २०१२ अंतर्गत कलम ७४ नुसार गुन्हा दाखल करत तातडीने अटक केली.
या अमानुष प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास देसाईगंज पोलिसांकडून युद्धपातळीवर सुरू आहे.

( #LOKVRUTTNEWS #lokvrutt.com @lokvruttnews #gadachirolinews #Maharashtra #crime #विनयभंग )