टीबीमुक्त भारतासाठी कोडापे परिवाराचा हातभार ; क्षयरुग्णांना प्रोटीनयुक्त आहाराचे वाटप

233

टीबीमुक्त भारतासाठी कोडापे परिवाराचा हातभार ; क्षयरुग्णांना प्रोटीनयुक्त आहाराचे वाटप

लोकवृत्त न्यूज
धानोरा :- जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने समाजसेवेचा एक हृदयस्पर्शी उपक्रम धानोरा तालुक्यात राबविण्यात आला. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रेरणेने श्री फाउंडेशन व कोडापे परिवाराने चव्हेला गावातील दहा क्षयरुग्णांना “निक्षय मित्र” म्हणून दत्तक घेत त्यांच्या आरोग्य पुनर्वसनासाठी सकस आणि प्रोटीनयुक्त आहाराचे वाटप केले.
कार्यक्रमाची सुरुवात बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याचे पूजन करून झाली. त्यानंतर क्षयरुग्णांना जीवनसत्वयुक्त आहार देण्यात आला. “हे फक्त अन्नदान नाही, तर आजाराशी लढणाऱ्या आपल्या बांधवांच्या मनोबलाला दिलेला हातभार आहे,” असे कोडापे परिवारातील सदस्यांनी सांगितले.
या प्रसंगी चव्हेला ग्रामपंचायत सरपंच अशोक बढाई, विशेषराव पोटी कोडापे (से.नि. राखीव पोलीस निरीक्षक), जिजाबाई कोडापे (से.नि. आरोग्य सेविका), बाबुराव आलाम (से.नि. पोलीस उपनिरीक्षक), वैभव सिडाम (सहायक अभियंता महावितरण), शीतल सिडाम, गोपिका शेडमाके, मंजुषा कोडापे, इंजी. पायल कोडापे, जेनिका कोडापे, सुमित आलाम, प्रकाश कोडापे, वेदात घुमे, बेली शेडमाके, गिरीश लेनगुरे (LTS), राखिम शहा (आरोग्य निरीक्षक), श्रीकांत कोडापे (आरोग्य सेवक), सदाशिव मंडावार (आरोग्य सेवक) तसेच आशा उर्मिला गावळे उपस्थित होते.
उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक करत “टीबीमुक्त भारत” या स्वप्नाच्या दिशेने कोडापे परिवाराने उचललेले पाऊल प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.