गडचिरोलीत आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची पोलिसात तक्रार :

161

 तेजस्वी यादववर पंतप्रधानांविरोधात बदनामीचा ठपका

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, दि.२२ : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद रामजी नरोटे यांनी आज गडचिरोली पोलीस ठाण्यात बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली. समाजमाध्यम X (ट्विटर) वरून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानकारक, बदनामीकारक व समाजात तेढ निर्माण करणारे मजकूर, गाणी व व्हिडिओ प्रसारित केल्याचा गंभीर आरोप आमदारांनी केला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, यादव यांनी “पंतप्रधान खोटारडे आहेत, खोटी आश्वासने देतात” अशा आशयाची ट्विट्स केली असून, त्यात बिहारमधील दौऱ्याशी संबंधित छायाचित्रे व व्हिडिओदेखील जोडले आहेत. या मजकुरामुळे गडचिरोलीतील सुजाण नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला असून, सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे आमदार नरोटे यांनी सांगितले.

या संदर्भातील ट्विट्सचे स्क्रीनशॉट पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर करण्यात आले असून, संबंधितांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

@lokvrutt.com #lokvruttnews # #gadachirolipolice #Maharashtra police #Maharashtra #BJP @Narendra Modi #Milind Narote