गडचिरोली : वाघाच्या हल्यात महिला गंभीर जखमी

0
1170

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली, ( Gadchiroil) 4 डिसेंबर : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासुन जवळच असलेल्या आंबेशिवनी येथील महिला वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटना रविवारी 4 डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. सोनी जितेंद्र उंदीरवाडे (२५) रा. आबेशिवनी ता. जि. गडचिरोली असे वाघाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, सदर महिला हि शेतावर गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला करून जखमी केले. जखमी महिलेला उपचार करण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले आहे
परिसरात अनेक दिवसांपासून वाघाचे हल्ले सुरू आहे याबाबत वन विभागाला वाघाला जेरबंद करण्याची मागणी वारंवार करण्यात येत आहे मात्र वन विभाग यांच्यात सफशेल फेल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
वाघास जेरबंद करण्याकरिता शाप शुटर ची टीम दाखल झाली आहे मात्र तब्बल एक ते दीड महिना होऊनही वन विभागाच्या हाती अपयश येत आहे. अनेक दिवसांपासून वाघाला जेरबंद करण्यात शाप शुटर वर लाखोंचा खर्च येऊन राहिला आहे मात्र वाघाने वन विभागाला हुलकावणी देत मनुष्यावर हल्ले सुरूच ठेवले आहे. यामुळे आता मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहोचलेला आहे. वाघास केव्हा जेरबंद करण्यात येणार असा सवाल परिसरातील नागरिक विचारीत आहे.

सदर घटनेबाबत अधिक विचारणा करण्याकरिता चातगाव चे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना फोनवरून संपर्क केला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही.

#tiger attack #Gadchiroli Forest

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here