LIC तर्फे व्हाॅट्सॲप सेवेला सुरुवात

0
997

LIC व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ

लोकवृत्त न्यूज
मुंबई 3 डिसेंबर :- देशातील सर्वात मोठी सरकारी भारतीय आयुर्विमा महामंडळाने त्यांच्या नोंदणीकृत LIC पॉलिसीधारकांसाठी निवडक इंटरॲक्टिव्ह WhatsApp सेवा सुरू केल्या आहेत. विमा क्षेत्रातील दिग्गज एलआयसीने शुक्रवारी घोषणा केली की व्हॉट्सॲप सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना 11 सुविधांचा लाभ घरात बसून मिळू शकेल.

ज्या पॉलिसीधारकांनी एलआयसी पोर्टलवर आपली पॉलिसी नोंदणी केली आहे त्यांनी व्हॉट्सॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या व्हॉट्सॲपवरून मोबाईल क्रमांक  8976862090  वर ‘HI’ पाठवावा. त्यानंतर ग्राहक 11 पेक्षा जास्त सेवांचा लाभ घेऊ शकतील. जेव्हा ग्राहक व्हॉट्सॲपवर ‘HI’ पाठवतो तेव्हा तो LIC च्या WhatsApp शी कनेक्ट होईल आणि स्क्रीनवर सेवांची यादी दिसेल. सूचीतील तुमच्या गरजेनुसार त्यावर क्लिक करून तुम्ही सेवेचा लाभ घेऊ शकाल.

1. प्रीमियम देय, / Premium due

2. बोनस माहिती, / Bonus Information

3. पालिसी स्थिती, / Policy Status

4. कर्ज पात्रता कोटेशन, / Loan eligibility Quotation

5. कर्ज परतफेडीचे कोटेशन, / Loan repayment quotation

6. कर्जाचे व्याज देय, / Loan Interest due

7. प्रीमियम भरलेले प्रमाणपत्र, / Premium paid certificate

8. युलिप – युनिट्सचे स्टेटमेंट, / ULIP – Statement of Units

9. एलआयसी सर्व्हिस लिंक्स, / LIC Service Links

10. सेवा निवडणे/निवड रद्द करणे, / Opt In/Opt Out Services

11. संभाषण समाप्त करा, / End Conversation

या व्हॉट्सॲप सुविधेमुळे आता एलआयसी पॉलिसीधारकांना पॉलिसीबाबतची विविध प्रकारची माहिती घरबसल्या घेता येईल. त्यासाठी कार्यालयात जावे लागणार नाही.
जास्तीत जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन एलआयसीने केले आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here