विद्यार्थीनीचा विनयभंग करणारा तो शिक्षक कोण ?

0
877

 

लोकवृत्त न्यूज
चंद्रपूर दि. 4 जानेवारी :- शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी असलेले नाते हे मार्गदर्शकाचे, पालकत्वाचे व काही वेळेस मैत्रीचेही असते. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्यांच्या यशाचा मार्ग दर्शवतात. शिक्षकांचे मुलांना रागावणे, समजावणे हे मुलांचे हित साधण्यासाठी असते. शिक्षक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी झटतातच; परंतु त्याचसोबत त्यांच्या भावनिक, सामाजिक जडणघडणीतही सहभाग घेतात. वेळप्रसंगी मुलांशी मैत्री करून त्यांना मन मोकळे करण्याची संधीही देतात. विद्यार्थीही ज्या गोष्टी पालकांशी मोकळेपणाने बोलू शकत नाहीत त्या शिक्षकांसमोर व्यक्त करतात. त्यामुळे शिक्षक व विद्यार्थ्यांचे नाते हे पालक व मित्र असे दुहेरी असते. मात्र दुहेरी नात्याला काळिमा फासण्याचे कार्य मुख्याध्यापक पदी असलेल्या शिक्षकाकडुन घडले.
सविस्तर वृत्त याप्रमाणे आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील एका खासगी शाळेतील एका मुख्याध्यापकाने शाळेतील विद्यार्थिनीला शाळेत नेण्याच्या बहाण्याने विविध अमिश दाखवत तू माझ्याशी मैत्री करशील काय, तुला काही पैशाची गरज असेल तर किती पाहिजे ते सांग असे म्हणून हात पकडत छेडखाणी केली. याबाबत सदर शिक्षकावर पोस्को अंतर्गत कारवाई झाल्याचे लोकचर्चेतून कळते. मात्र पोलीस प्रशासनाकडून याबाबत टाळाटाळ करण्यात येत आहे त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कारवाई वर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
सदरहू शिक्षकाचे कश्याप्रकारे कृत्य गावभर चर्चेत असून शिक्षकाच्या लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या अनेक महिला व विद्यार्थिनी बदनामीपोटी समोर येत नसल्याने सदरहू शिक्षकाचे फावल्या गेले त्यामुळे त्याच्या लिंगपिसाट मनोवृत्तीमध्ये वाढ झाली. तेव्हा नागरिकांनी सदरहू शिक्षकाच्या अत्याचाराचा पाढा वाचण्याकरिता समोर येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. व तो शिक्षक कोण ? ती शाळा कोणती ? पहा पुढील भागात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here