मुडझा येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

166

मुडझा येथे माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

लोकवृत्त न्यूज
गडचिरोली :– गडचिरोली तालुक्यातील मुडझा ग्रामपंचायत अंतर्गत तब्बल ६ कोटी ४ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार व भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते रविवारी (दि. २५ ऑगस्ट) पार पडले.
सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांमध्ये डॉ. होळी यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या निधीमधून अनेक महत्त्वाच्या कामांना गती मिळाली आहे. यामध्ये ३०५४ (TSP) निधी १ कोटी ७७ लाख, जनरल बजेट १ कोटी ७५ लाख, दलित वस्ती सुधारणा निधी ३२ लाख या अंतर्गत सीसी रोड, नाली व मोरी बांधकाम अशा एकूण ३ कोटी ८४ लाखांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
तर खनिज निधी १ कोटी ७० लाख, तांडा वस्ती १० लाख, २५१५ निधी २० लाख, आमदार निधी १० लाख, जिल्हा वार्षिक योजना १० लाख या अंतर्गत सीसी रोड, नाली, सभामंडप, आवारभिंत व मोरी बांधकामाची कामे पूर्ण करून त्यांचे लोकार्पण करण्यात आले.
या सर्व कामांची किंमत मिळून ६ कोटी ४ लाख रुपये इतकी आहे. या वेळी डॉ. होळी यांनी संबंधित विभाग प्रमुख व कंत्राटदारांना “कामे उच्च दर्जाची व निर्धारित वेळेत पूर्ण व्हावीत” अशा स्पष्ट सूचना दिल्या.
कार्यक्रमाला मुडझा ग्रामपंचायत सरपंच शशिकांत कोवे, सदस्य रामदास सुरपाम, राकेश लोणारकार, जोत्सना उमरगुंडावार, संचालक हेमंत बोरकुटे (कृ.उ. बाजार समिती गडचिरोली), शंकर चौधरी, चंदू लोणारकर, मनोहर वाढई, मनोज गडपायले, मधुकर लोणारकर, विकेश गडपायले, आकाश चौधरी, खूबसूरत दाणे, पुरुषोत्तम मेश्राम, सारिका मोगरे तसेच ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#मुडझा #गडचिरोली #विकासकामे #देवरावहोळी #भूमिपूजन