चिंधी माल येथे तरुणाचा फिट आल्याने पाण्यात पडून मृत्यू

39

चिंधी माल येथे तरुणाचा फिट आल्याने पाण्यात पडून मृत्यू

लोकवृत्त न्यूज 
नागभीड :- तालुक्यातील चिंधी माल गावालगतच्या शेतशिवारातील बोडीमध्ये आज (सोमवार, २५ ऑगस्ट) सकाळी ८ वाजता महेश अभिमन सलामे (वय २९) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, महेश सकाळी शौचालयासाठी बोडीकाठी गेला असता अचानक फिट येऊन तो थेट पाण्यात पडला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच नागभीड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह नागभीड ग्रामीण शासकीय रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी हलविण्यात आला.
या घटनेचा पुढील तपास सपोनि पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय पानसे करीत आहेत.

@lokvruttnews @LOKVRUTTNEWS @lokvrutt.com #Nagbhid #gadchirolinews #Chandrapurnews #Accident #Administration #Maharashtra #फिट